टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतात मोटर सायकलवर चारा आणावयास निघालेल्या दोघा मित्रांना रस्त्यात अडवून ३३ वर्षीय तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी गजाने मानेवर मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी
राधेशाम मोहन तोडकरी याच्याविरूध्द अनु. जाती जमाती कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे घडली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अनिल सोनवले (वय ३३) हे व त्याचा मित्र बाळासाहेब तोडकरी गेली अनेक दिवसापासून खास दोस्ती असल्याने दोघेजण एकत्र मिळून फिरत असल्याने त्याचा राग आरोपी राधेशाम तोडकरी याच्या मनात होता.
फिर्यादी व त्याचा मित्र हे दि.३१ रोजी सायंकाळी ५.४५ वा. एम एच १३, सी.एच.५१२१ या स्प्लेंडर मोटर सायकलवर बसून जनावरांना चारा आणणेकरीता सावे येथे शेतात चालले असताना
लक्ष्मी दहिवडी ते मांजरी रोडवर बरगे हॉटेलजवळ आरोपीने पाठीमागून येवून मोटर सायकल थांबण्यास सांगितले. यावेळी फिर्यादीने रोडच्या कडेला मोटर सायकल उभी केली आरोपीने जवळ येवून तू बाळयासोबत का फिरतो?
असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून जवळ असलेला लोखंडी गज फिर्यादीच्या मानेवर मारून जखमी केले. तसेच फिर्यादीचा मित्र बाळासाहेब तोडकरी याच्या डोक्यात दगड घालून त्यालाही जखमी केले.
तुम्ही आता वाचलात नंतर बघून घेतो असे म्हणून आरोपी निघून गेला. जखमींना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सोलापूरला सिव्हील येथे दाखल करण्यात आले होते.
तंदुरस्त झाल्यानंतर त्यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिल्याचे म्हटले आहे. याचा अधिक तपास डी. वाय.एस.पी. विक्रात गायकवाड हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज