मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मामा म्हणजे भाच्याचा किंवा भाचीचा हक्काचा माणूस आहे. भाचा आणि भाचीचे लाड पुरवणारी व्यक्ती म्हणजे मामा. आपल्या जन्मावेळी आई-वडील, आजी-आजोबांप्रमाणेच निस्सिमपणे प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मामा.
मामाचा भाचा किंवा भाचीच्या लग्नातही महत्त्वाची भूमिका असते. मामा असल्याशिवाय भाचा किंवा भाचीचं लग्न होत नाही. कारण मंगलाष्टिका म्हणताना नवरदेव आणि नवरी यांच्यामध्ये असणारं आंतरपाट पकडण्यासाठी मामाच लागतो. त्यामुळे नवरदेव आणि नवरी या दोघांचे मामा तिथे आंतरपाट घेऊन उभे राहतात.
यावरुनच मामा किती महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला समजते. असं असलं तरी काही जण मामा-भाचा किंवा मामा-भाची या नात्याला काळीमा फासणारे प्रकार करतात.
आपल्याला महाभारतातील शकुनी मामा किंवा कंस मामा सर्वांना माहिती आहेत. शकुनी मामा हा आपल्या भाच्यांना चुकीचे सल्ले देतो. त्यामुळे कौरवांचं साम्राज्य उद्ध्वस्त होतं. तर शकुनी मामा हा श्रीकृष्णांना मारण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो. यासाठी तो वेगवेगळ्या व्यक्तींना श्रीकृष्णांना मारण्यासाठी पाठवतो.
पण श्रीकृष्ण सर्वांना पुरुन उरतात. अखेर श्रीकृष्णच त्या शकुनी मामाचा बंदोबस्त करतात. असेच मामा आजही हयात आहेत. ते असे प्रकार करतात की, त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. कोल्हापुरातील एका मामाने असंच कांड केलं आहे, ज्यामुळे हजारो जणांचा जीव गेला असता. पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
नेमकं काय घडलंय?
भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथे ही घटना घडली. आपल्या मर्जी विरोधात भाचीने आठवड्यापूर्वी गावातीलच मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याने बदनामीच्या रागातून मामाने हे कृत्य केलं. महेश जोतीराम पाटील असं या मामाचे नाव आहे.
या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसांकडून शोध सुरू आहे. लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहचविण्याचा प्रकार उघड झाला आहे.
जेवणात विषारी औषध टाकताना मामा आणि आचाऱ्याची झटापट झाल्याचीही चर्चा आहे. आचाऱ्याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज