मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा-सोलापूर रोडवर सायकलवर मॉर्निंग वाकिंगसाठी गेलेल्या सायकलस्वराला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सायकलस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आज सकाळी 6.45 च्या सुमारास ही मंगळवेढा पासून सोलापूर रोडवर काही अंतरावर घडली आहे.
चंद्रकांत सोनगे असे मयत झालेल्या सायकलस्वराचे नाव असून मयत चंद्रकांत सोनगे हे मूळचे सिद्धापूर येथील असून ते मंगळवेढा येथे स्थायिक झाले होते.
दररोज नियमित सकाळी चंद्रकांत सोनगे हे सायकलवर जात होते. माघारी येत असताना पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सिद्धापूरचे माजी सरपंच संतोष सोनगे यांचे ते बंधू होत. चंद्रकांत सोनगे यांच्या मृत्यूमुळे सिद्धापूर परिसरावर शोककळा पसरली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज