टीम मंगळवेढा टाईम्स ।
दारूच्या नशेत विनाकारण मुलगा शिवीगाळी, दमदाटी करून गच्चीस धरून गळा आवळण्याचा प्रयत्न करून वारंवार मानसिक, शारिरिक त्रास दिल्याने या मुलाच्या त्रासाला कंटाळून
७२ वर्षीय वडीलांनी दोरीच्या सहाय्याने शेतातील करंजीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मल्लेवाडी ता. मंगळवेढा येथे घडली असून याप्रकरणी मुलगा राजाराम अर्जुन गायकवाड याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत अर्जुन शहाजी गायकवाड (वय ७२ रा. मल्लेवाडी) यांना त्यांचा मुलगा तथा आरोपी राजाराम अर्जुन गायकवाड हा दारूच्या नशेत घरी येवून विनाकारण शिवीगाळी करीत वडिलांच्या गच्चीला धरून गळा आवळण्याचा प्रयत्न करीत असे.
या त्रासाला कंटाळून दि.२९ रोजी सकाळी ११.३० वा. मल्लेवाडी येथील दौलतसिंग रजपूत यांच्या शेतातील करंजीच्या झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.
दरम्यान मयताच्या खिशात एक लिखीत चिठ्ठी सापडली असून मुलगा राजाराम हा गेली पंधरा दिवसापासून फार त्रास करीत आहे, दोन दिवसापुर्वी माझा गळा दाबून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहे.त्याच्या धमकीला घाबरून मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आले होते.
याची फिर्याद मुलगा जयंत अर्जुन गायकवाड याने पोलिसात दिल्यानंतर भा.द.वि.कलम ३०६ प्रमाणे आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज