टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कागष्ट परिसरातून 25 वर्षीय विवाहित महिला व 8 वर्षीय मुलगा असे दोघेजण बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या पतीने पोलिसांत दिली असून पोलिस त्या दोघांचा कसून शोध घेत आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, खबर देणारे हे मूळचे खैराव ता. जत येथील ऊसतोड कामगार असून ते सध्या कागष्ट परिसरात रहावयास आहेत.दि.13 रोजी खबर देणारे हे बठाण येथे ऊसतोडणी करून ते आपल्या मूळ कागष्ट येथील कोप्यावर आले.
त्यावेळेस त्यांची पत्नी व तीन मुले घरी असल्याचे निदर्शनास आले.खबर देणारे हे दुसर्या पत्र्याच्या खोलीत गप्पा मारत बसले होते.
तदनंतर पाहिले असता त्यांची पत्नी व 8 वर्षीय मुलगा कोणाला काही न सांगता अचानक गायब झाल्याचे दिसून आले.त्या दोघांचा सर्वत्र शोध घेतला.मात्र ते मिळून आले नाहीत.
बेपत्ता महिलेचे वर्णन अंगाने सडपातळ,रंग सावळा,चेहरा गोल,नाक बसके,डोळे काळे,उंची 4.5 फुट,नेसणेस अंगावर पांढर्या रंगाची साडी,तर मुलगा अंगाने मध्यम, रंग सावळा,चेहरा गोल,
नाक सरळ,अंगात निळया रंगाचा शर्ट व जीन पँट असे वर्णन असून वरील दोघे कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज