mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनो! बारावी व दहावीच्या परीक्षा ‘या’ पध्द्तीने होणार; वर्षा गायकवाड यांनी सांगितला संपूर्ण प्लॅन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 17, 2022
in राज्य, शैक्षणिक
विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र किंवा उपकेंद्र या पद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 9613 तर

इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची किंवा उपकेंद्रांची संख्या 21349 इतकी असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय शिक्षण विभागाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शाळांचे नियमित वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुरूवातीस ऑनलाईन पद्धतीने व ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने नियमित वर्ग सुरू करण्यात आले.

आता प्रचलित पद्धतीने राज्य मंडळाच्या परीक्षा होत असून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरूवात देखील झाली आहे. प्रचलित पद्धतीने परीक्षा झाल्यास मुख्य परीक्षा केंद्रांची संख्या बारावीसाठी 2943 होती.

तर, शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन केल्याने बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 9613 इतकी असणार आहे. प्रचलित पद्धतीने परीक्षा झाल्यास मुख्य परीक्षा केंद्रांची संख्या दहावीसाठी 5042 होती.

तर, शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन केल्याने दहावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 21349 इतकी असेल.

परीक्षेच्या नियोजनात बदल झाल्यामुळे बारावी आणि दहावीच्या परीक्षांसाठी अतिरिक्त परीक्षा उपकेंद्रांची संख्या 22969 इतकी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन 15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षी 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधीलच अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला असल्याने लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर, लेखी परीक्षेच्या 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीसाठी किमान 40 टक्के प्रात्यक्षिकावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून इयत्ता दहावीसाठी प्रात्यक्षिक प्रयोग/ गृहपाठावर आधारित मूल्यमापन करण्यात येत आहे.

तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन व तत्सम मूल्यमापनात मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्यात येत आहे. इयत्ता बारावी व इयत्ता दहावी परीक्षेच्या प्रात्यक्षिक/ तोंडी/ अंतर्गत मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व व परीक्षोत्तर संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या सुविधांबाबत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ परीक्षा केंद्र/ परिरक्षक व संबंधित घटकांना विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.(स्रोत:इंडिया दर्पण)

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

June 28, 2022
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढयात आज गुणवंतांचा सत्कार; करिअर विषयक मार्गदर्शन शिबीर

June 28, 2022
आमदार शहाजी पाटील यांनी केले खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..’घर की मुर्गी दाल बराबर’ आहे; स्वतःच्याच पक्षाला लगावले टोले

महाराष्ट्रात ‘डोंगार, झाडी’ व्हायरल झाली की केली? तो कार्यकर्ता सांगतोय सत्य; मिम्सनंतर आता गाणंही व्हायरल…ऐका

June 28, 2022
नोकरीची संधी! मंगळवेढ्यात जॉब पाहिजे; मोठ्या कंपनीत करा नोकरी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

गोल्डन चान्स! मंगळवेढ्यातील मोठ्या ज्वेलर्स कंपनीत नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

June 27, 2022
राज्यपाल कोश्यारी आज सोलापूर दौऱ्यावर, आंदोलनाच्या इशाऱ्याने पोलिस अलर्ट; शिवप्रेमी अडवणार राज्यपालांची वाट

राज्यपाल इज बॅक! महाराष्ट्रातल्या राजकीय हालचालींना वेग येणार; शिंदेसेनेची ‘ही’ असणार रणनीती

June 26, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

फळ मिळाले! शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सोलापुरातील ‘या’ दोघांची नियुक्ती; पक्षाशी एकनिष्ठता आली कामी

June 26, 2022
तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

सर्वात मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता?;अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

June 26, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Big Breaking! शिंदे गटाचं नाव ठरलं; ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण होणार

June 25, 2022
Next Post
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मुख्याधिकारी हटाव, नगरपरिषद बचाव, मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना बडतर्फ करा; भाजप युवा मोर्चाची मागणी

ताज्या बातम्या

अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

June 28, 2022
ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

June 28, 2022
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढयात आज गुणवंतांचा सत्कार; करिअर विषयक मार्गदर्शन शिबीर

June 28, 2022
बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

June 28, 2022
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

संभ्रम अवस्था! विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार पालख्यांच्या स्वागताला मामा की बापू?

June 28, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा