(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-)
उचेठाण येथील रामेश्वर कोळी यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आरोपी आनंदा शिवपुजे , रवी शिवपुजे या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायाधीश जी . एम . चरणकर यांच्यासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
फिर्यादी रामेश्वर कोळी व त्याचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर कोळी हे मोटारसायकल ( एमएच १३ / ६७४० ) वरून घराकडे जात असताना आरोपींनी मोटारसायकल अडवून तू विकास गडदेला काही पण शिकवतोस काय असे म्हणून तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केले.पोलिसांनी आनंदा, रवी यांना अटक केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज