mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बापलेकाच्या खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथे शेत जमिनीच्या वादातून संदीपान बाबासो शिंगाडे व राजकुमार संदीपान शिंगाडे या बापलेकाचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी आरोपी राहुल रामा सरगर (वय 25) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी हा निकाल दिला. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी हा खटला चालवला.

अधिक माहिती अशी, चोरोची गावातील शिंगाडे मळा येथे मृत संदीपान हे भाऊ रामचंद्र, शामराव, विलास, रावसाहेब आणि चुलते देवाप्पा शिंगाडे असे सर्वजण कुटुंबासमवेत राहत होते. आरोपी राहुल सरगर हा देवाप्पा शिंगाडे यांच्या जावयाचा मुलगा असून तो देखील भाऊ महादेव सरगरसमवेत कुटुंबासह शिंगाडे मळ्यात राहण्यास होता.

शिंगाडे यांच्या वस्तीवर जाण्यासाठी शेतातून वाट होती. सर्वजण या वाटेवरूनच जात होते. ऑगस्ट 2015 मध्ये गावच्या सरपंचानी शेतातील रस्ता सरकारी खर्चातून करून मिळतो असे सांगितले. त्यावेळी रामा सरगर याने नकाशात वाट नाही आणि आतासुद्धा येथे वाट नाही असे सांगून तो निघाला.


रात्री रामाचा मुलगा राहुल सरगर याने सदरच्या रस्त्यावर दगड ठेवले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास संदीपान शिंगाडे व मुलगा राजकुमार यांनी चुलते देवाप्पा आणि आरोपी राहुल याला रस्ता का बंद केला म्हणून विचारणा केली. तेव्हा त्यांच्यात वादावादी झाली. एकमेकांना शिवीगाळ झाली. त्याचवेळी राहुल याने त्याच्याकडील चाकू काढून राजकुमारच्या पोटात वार केले. तसेच संदीपान यांच्या पोटात आणि तोंडावरही वार केले. संदीपान यांचा भाऊ रामचंद्र हा सोडवण्यासाठी धावला असता त्यांच्यावरही वार केले. तेव्हा शिंगाडे कुटुंबातील महिला भांडणे सोडवण्यासाठी धावल्या.
जखमी बापलेक संदीपान व राजकुमार यांना श्री. यमगर यांच्या जीपमधून मिरजेच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेव्हा डॉक्‍टरांनी दोघांना मृत घोषित केले.

जखमी रामचंद्र यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. सहाय्यक निरीक्षक इनामदार यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुराव्यानुसार राहुलला दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
तरुणी ज्वेलर्सच्या दुकानात करायची चोरी,पोलिसांनी पकडले

तरुणी ज्वेलर्सच्या दुकानात करायची चोरी,पोलिसांनी पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला थेट इशारा; ‘त्या’ विजयावरही संशय व्यक्त करत थेट निशाणा

May 6, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याला न्यायालयाने चारली धूळ! ५ वर्षे सक्तमजुरी आणि जबर दंड; ​पंढरपूर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; लाच मागाल तर थेट तुरुंगात जाल

May 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा