mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बँकेला 23 कोटीचा गंडा : दोन कोल्ड स्टोरेजधारक फरारीच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
बँकेला 23 कोटीचा गंडा : दोन कोल्ड स्टोरेजधारक फरारीच

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

बँक ऑफ बडोदाने तारण कर्ज दिलेल्या बेदाणा आणि हळदीची कोल्ड स्टोअरेजमधून परस्पर विक्री करण्यात आली होती. बँकेला 23 कोटी 12 लाख 74 हजारांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. मात्र दोन जण अद्याप फरारी आहेत.

या प्रकरणात जिल्ह्यातील 8 कोल्डस्टोअरेज मालकांवर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी साई अ‍ॅग्रोटेक कोल्ड स्टोअरेज आणि राधाकृष्ण कोल्ड स्टोअरेजचे दीपक मधुकर गुरव (कवठेएकंद) आणि बीएल कोल्ड स्टोअरेजचे मालक राहुल दिनेश मित्तल (माधवनगर) हे दोघेजण फरारी आहेत.

दरम्यान या प्रकरणी बँक आणि कोल्डस्टोरेजधारक यांच्यात मध्यस्थी करणार्‍या मुंबईतील सीएनएक्स कार्पोरेशन कंपनीच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल असून जामिनासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे

पोलिसांनी माहिती दिलेली माहिती अशी बेदाणा व हळद मालावर बँक ऑफ बडोदाकडून तारण कर्ज दिले जाते. बँक, शेतकरी आणि कोल्ड स्टोअरेज यांच्यात समन्वयासाठी सीएनएक्स कॉर्पोरेशन या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने शेतीमालाची माहिती बँकेला दिली जाते. त्यानंतर कंपनीच्या अहवालानुसार संबंधित शेतकर्‍यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

सन 2017 मध्ये मिरज व तासगाव तालुक्यातील 48 शेतकर्‍यांना बँकेकडून कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यानुसार या शेतकर्‍यांचा शेतीमाल कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आला होता. जानेवारी 2019 मध्ये बँकेने कोल्ड स्टोअरेजमधील तारण मालाची पाहणी केली होते. पण कोल्ड स्टोअरेजमध्ये बेदाणा व हळद नसल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर बँकेने संबंधित शेतकरी व कोल्ड स्टोअरजेकडे विचारणाही केली. माहिती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी मुंबईतील सीएनएक्स कार्पोरेशन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार निरुपमा पेंडूरकर, त्याच कंपनीचे पश्चिम विभागाचे प्रमुख अजित नारायण जाधव (रा. हसनी आश्रम, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

अभ्युदया कोल्ड स्टोअरेजचे प्रद्युम्न बाळगौंडा पाटील (वसगडे), गोमटेश कोल्ड स्टोअरेजचे अनिल पारिसा सुगन्नावर (कुपवाड),लक्ष्मी अ‍ॅग्रो कोल्ड स्टोअरेजचे संचालक व भागीदार पवनकुमार आदिनाथ चौगुले (भोसे), जयपाल बाबू शिरगावे (गणेशवाडी, ता. शिरोळ), लखमगौंडा जिगौंडा पाटील (शेडबाळ, ता. अथणी), रूपाली वृषभनाथ शेडबाळे (मालगाव, ता. मिरज) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यापैकी काहींनी बँकेचे 4 कोटी 96 लाख रुपये परत केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोन्याचे दागिने घडविण्याचा बहाणा,लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

सोन्याचे दागिने घडविण्याचा बहाणा,लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा