मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा नगरपरिषदेने हद्दवाढीचा प्रस्ताव दिला आहे , अशी माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी दिली.मंगळवेढा नगरपरिषदेने यापूर्वी २१ फेब्रुवारी २०१३ रोजी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला दिला होता . पण या प्रस्तावाचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्याने शासनाकडून पुन्हा २७ एप्रिल २०१७ रोजी पत्र पाठवून नवीन प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचित केले होते.
त्यानुसार २२ जून २०१७ रोजी नगरपरिषदेने पुन्हा हद्दवाढीबाबत ठराव केला व नवीन आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारीमिलिंद शंभरकर यांच्याबरोबर या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली व त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.मंगळवेढा नगरपरिषदेची स्थापना १८७४ ला झाली आहे.त्या काळापासून नगरपालिकेचे क्षेत्र १.४८ चौरस किलोमीटर आहे.
आता मंगळवेढा शहराभोवती असलेल्या संत दामाजीनगर व चोखामेळानगर या नगरांचे ग्रामपंचायतीत रुपांतर झाले आहे.या दोन्ही ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन २००१ मध्ये ६ हजार ८२४ तर सन २०११ मध्ये १ हजार ७४३ इतकी झाली आहे.
त्यामुळे मंगळवेढा शहराची हद्दवाढ केल्यास या दोन्ही ग्रामपंचायती नगरपरिषदेत विलीन होणार आहेत.नवीन हद्दवाढ भागात दक्षिण पूर्वेकडील बोराळे ते मरवडे रस्त्यामधील जमीन गट , उत्तर पूर्वेचे धर्मगाव ते बोराळे रस्त्यामधील गट , दक्षिण पश्चिम भागातील मरवडे व सांगोला रस्त्यामधील गट , वायव्येस धर्मगाव ते डोंगरगाव , खोमनाळ रस्त्यामधील गट , तेथून अकोले,पंढरपूर रोडमधील गट अशा भागाचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे . पहिल्या ठरावास काही लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने बारगळला होता.
पण आता संत दामाजीनगर व चोखामेळानगर या ग्रामपंचायतीला नगरपरिषदेच्या सुविधा आहेत. दोन्ही ग्रामपंचायतीकडे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने अनधिकृत बांधकामे वाढत आहेत,त्याचबरोबर पाणीपुरवठा व इतर सुविधांचा खर्च वाढल्याने हद्दवाढ करण्यावर आता एकमत होत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज