मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
२६ / ११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तसेच जमात – उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला पाकिस्तानातील लाहोर न्यायालयाने बुधवारी टेरर फंडिंगच्या ( दहशतवाद्यांना पैसा पुरविणे ) दोन प्रकरणांत दोषी ठरविले असून , त्याला ५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे .
सईदविरुद्ध टेरर फंडिंगसह मनी लाँडरिंग तसेच अवैध कब्जाची मिळून २३ प्रकरणे दाखल आहेत . न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता . बुधवारी तो जाहीर करण्यात आला .
सईद याच्याविरुद्ध गतवर्षी डिसेंबरमध्येच न्यायालयाने टेरर फंडिंगचे आरोप निश्चित केले होते . याआधी ३ जुलै रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिज आणि त्याच्या टोळीतील दहशतवाद्यांविरोधात १३ गुन्हे दाखल केले होते .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज