मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढयातील शहर एंटरटेनमेंटची 6 वी निर्मिती असलेल्या निःशब्द या लघुपटाचा शुभारंभ शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.00 वा. मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते व शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली भारत चित्र मंदिर येथे होणार आहे.
यावेळी नगरसेवक प्रविण खवतोडे,भारत चित्रमंदिरचे दयानंद दत्तू, वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू,राजे ग्रुपचे संस्थापक विजयराज कलुबर्मे, ढगे डिजीटलचे मालक लहू ढगे, लघुपटाचे निर्माते दिगंबर भगरे,दिग्दर्शक संतोष शिंदे,कलावंत सागर मलठणकर,जयश्री गोविंद,विजया क्षिरसागर आदी उपस्थितीत राहणार आहेत.
रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन शहर एंटरटेनमेंटचे प्रॉडक्शन मॅनेजर सुहास भगरे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज