mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सातारा जिल्ह्यातील या गावांचे नामकरण होणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सातारा जिल्ह्यातील या गावांचे नामकरण होणार?


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

राज्यभरातील वाड्या-वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 21 गावांतील वाड्यांच्या नावामधून जात हद्दपार होणार आहे. या गावांचे भीमनगर, सिद्धार्थनगर, ज्योतीनगर, शाहूनगर असे नामकरण होण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात 1 हजार 739 गावे आहेत, तर 1 हजार 495 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यातील काही गावासह वाड्या-वस्त्यांना चांभारवाडी, धनगरवाडी, रामोशीवाडी, लोहारवाडी, भुयाचीवाडी, गोसावेवाडी, गोसाव्याचीवाडी, महारवाडा, धनगरवाडा, बौद्धवाडा, ढोरवस्ती, मांगवाडा अशी नावे पूर्वीपासून दिली असल्याने ही गावे व वाड्या-वस्त्या जातीच्या नावाने ओळखल्या जात आहेत.

या वस्त्या व वाड्यांच्या नावाला जात जोडण्याची प्रथा बंद करण्याचे राज्य शासनाने धोरण आखले आहे. या गावे व वाड्या-वस्त्यांना भीमनगर, सिद्धार्थनगर, ज्योतीनगर, शाहूनगर अशी विविध नावे देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. वाड्या व वस्त्यांच्या नावांमध्ये जाती-जमातीचा उल्‍लेख करणे अनुचित आहे. जिल्ह्यातील जातीचा उल्‍लेख असलेल्या गावे व वाड्यांचा विकास झाला असला, तरी तेेथे जातीचा उल्‍लेख केला जात आहे. त्यामुळे या वाड्या-वस्त्यांचे नामकरण करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी राज्याचे सामाजीक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांना सूचना केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव शासनामार्फत तयार करण्यात येत आहे.


राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार देण्यात येत होता. या पुरस्कारातून दलित हा उल्‍लेख काढून टाकण्याचा निर्णय 2 एप्रिल 2012 रोजी शासनाने घेतला होता. त्याऐवजी समाजभूषण पुरस्कार असे नामकरण नमूद करण्यात आले होते. जिल्ह्यात फलटण तालुक्यात चांभारवाडी, माळवाडी, सातारा तालु्क्यात धनगरवाडी कोडोली, धनगरवाडी निगडी, माळ्याचीवाडी, माण तालुक्यात कासारवाडी, कोरेगाव तालुक्यात न्हावी बु., रामोशीवाडी, खटाव तालुक्यात गोसाव्याचीवाडी, कराड तालुक्यात लोहारवाडी, भुयाचीवाडी, गोसावेवाडी, वाण्याचीवाडी, माळवाडी, वाई तालु्क्यात लोहारे, जावली तालुक्यात कुंभारगणी, खंडाळा तालुक्यात धनगरवाडी, वाण्याचीवाडी, पाटण तालुक्यात सुतारवाडी, कुंभारगाव, मराठवाडी अशा 21 वाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जातीच्या नावाने ओळख असलेल्या गावांचा शासन लवकरच नामकरण सोहळा करणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा,एकाविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा,एकाविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा