मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची बदनामी करणारे व्हिडिओ यूट्यूब आणि सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांविरोधात पुणे सायबर शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदुरीकर यांचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.
सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य करणाऱ्या निवृत्ती महाराजांच्या कीर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. त्यामुळे इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. हा वाद आता आणखीणच उफाळत आहे.
इंदुरीकरांवर चोहेबाजुने टीका होत होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षाही तैनात करण्यात आली होती.
शरद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदुरीकरांचे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करून त्यांची बदनामी केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. भादंविच्या कलम 500 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदुरीकर हे त्यांच्या कीर्तनातून सतत महिलांविरोधात बोलत असतात. महिलांची बदनामी करत असतात, त्यामुळे त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज