मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अनुभव नसलेल्या व पात्रता निकष पूर्ण न केलेल्या एका उमेदवाराची निवड विद्यापीठ प्रशासनाने केल्याने शासनाची फसवणूक झाली. याबाबत कुलगुरू व संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात दिले. दरम्यान, याविषयी विचारले असता, निवड प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू यांनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करून निकष पात्रता डावलून शासनाची फसवणूक केली.
किशोर खोत यांची सिस्टिम अॅनॅलिस्ट पदावर गैरप्रकारे नेमणूक केली. या बेकायदेशीरपणे केलेल्या भरती प्रक्रियेमुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, किशोर खोत व संबंधित व्यक्तीवर तत्काळ शासन फसवणुकीचा गुनहा दाखल करण्यात यावा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज