मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनरने एका मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बुलेटवरील पशुचिकित्सक डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी माढा तालुक्यातील वेणेगाव येथील सोनाई दूध शीतकरण केंद्राजवळ झाला.
भीमानगर येथील पशुचिकित्सक डॉ. प्रशांत सोपान कुंभार (वय 34) व कैलास दत्तात्रय गिरी (वय 35, रा. आलेगाव, ता. माढा) हे दोघे बुलेटवरून (एमएच 45 एसी 2104) मोडनिंबकडे निघाले होते. ते वेणगाव येथील सोनाई दूध शीतकरण केंद्राजवळ आले असता त्यांच्या मोटारसायकलला कंटेनरने (एमएच 14 ईएम 5994) जोरदार ठोकरले
.
यात प्रशांत कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला, तर कैलास दत्तात्रय गिरी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरचालक वाहन घेऊन तसाच पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिस व महामार्ग पथकाचे पोलिस कर्मचारी अपघातस्थळी पोहोचले. जखमी कैलास गिरी यास रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची खबर सुदाम दामू कुंभार यांनी दिली. अभिमान गुटाळ अधिक तपास करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज