मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
माढा सबजेलमध्ये शनिवारी (ता. 22) पहाटे दरवाजाच्या लोखंडी गजास गळफास लावून संशयित महिला आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत माढा पोलिसांत पोलिस हवालदार गंगाधर उघडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शनिवारी (ता. 22) रात्री माढा सबजेल येथे पहारा देत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास महिला लॉकअप रूममधून महिलांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने श्नी. उघडे रूमकडे गेले.
त्यावेळी संशयित आरोपी शीतल काळे (वय 25, रा. साडे, ता. करमाळा) हिने सबजेलमधील महिला लॉकअप रूमच्या दरवाजाच्या लोखंडी गजाला साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याच रूममधील महिला आरोपीने महिलेचा गळफास सोडविला.
या महिलेला तातडीने माढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज