मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
बीजिंग, बॅंकॉक आणि मलेशिया असा प्रवास करून भारतात परतलेल्या वाशीतील एका 29 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. “कोरोना’बाधित रुग्णांसाठी विमानतळावरील तपासणीत या महिलेवर संशय आल्याने अधिकाऱ्यांनी या महिलेला शनिवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या या महिलेवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
संबंधित महिला कामानिमित्ताने परदेशात गेली होती. बॅंकॉक आणि मलेशिया या दोन देशांच्या दौऱ्यानंतर चीनमधील बीजिंग शहरातून 19 फेब्रुवारीला ती भारतात परतली. दरम्यान, विमानतळावर तिची तपासणी केली असता तिच्यात “कोरोना’ची लक्षणे आढळून आली.
महिलेला ताप असल्यामुळे शनिवारी तत्काळ कस्तुरबा गांधी रुग्णालयात रवानगी करण्यात आली. सध्या या महिलेवर उपचार सुरू असून, सर्व चाचण्या घेण्यात आल्यानंतरच रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज