मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पुत्रप्राप्तीसाठी ऑड इव्हनचा फॉर्म्युला सांगणारे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज चांगलेच अडचणात आले होते. तृप्ती देसाई यांच्यासह अंनिस इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते. मात्र आज सायबर सेलने त्यांना मोठा दिलासा दिलेला आहे.
इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त कीर्तनाचा व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध नसलयाचं सायबर सेलने म्हटलं आहे. सायबर सेलच्या या स्पष्टीकरणानंतर इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मानण्यात येत आहे.पीसीपीएनडीटी अॅक्टनुसार इंदोरीकर महाराजांना नोटीस देखील पाठवण्यात आली होती. त्यांनी त्या नोटीसीला उत्तर देताना आपण तसं कीर्तन केलंच नाही, असं म्हटलं होतं.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज