मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
बळजबरीने शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा मनस्ताप व अपमानातून महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. ही घटना बीड जिल्ह्यातील गोपाळपूर येथे घडली आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट दिली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण महादेव नवघरे रा. गोपाळपूर याने म्हटले आहे की, आरोपी राम उर्फ माउली लक्ष्मण नवघरे याने या महिलेचा पती बाहेरगावी राहतो याचा गैरफायदा घेऊन (दि.२४) फेब्रुवारी रोजी रात्री १० ते ११ वा. च्या सुमारास घरात घुसून फिर्यादीच्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. या बलात्काराचा मनस्ताप व अपमान सहन न झाल्याने तिने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.
या फिर्यादीवरून संशयीत आरोपी राम उर्फ माउली लक्ष्मण नवघरे (रा. गोपाळपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अति. पोलिस अधिक्षक स्वाती भोर , उपविभागीय अधिकारी राहूल धस, पोलिस निरीक्षक पुरभे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज