मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने त्याचा फायदा घेत परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीवेळी सोलापूर महापालिकेत त्याची प्रचिती येईल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र झाले उलटेच. भाजपचा निर्णायकी सदस्याला “गायब’ करून जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला कॉंग्रेसचे तब्बल दोन सदस्य गैरहजर राहिल्याने तोंडघशी पडावे लागले आणि कॉंग्रेसच्या मदतीने भाजपचा सभापती झाला.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समिती सभापतीची निवडणूक झाली. भाजपच्या वतीने जय साळुंके आणि शिवसेनेच्या वतीने परशुराम भिसे रिंगणात होते. भाजपचे भैरामडी यांना गेल्यावेळीही डावलण्यात आले होते, त्यामुळे ते सुरवातीपासूनच या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहिले.
भाजपच्या भैरण्णामुळे शिवसेनेला विजयश्री मिळणार याबाबत श्री. कोठे यांच्या विश्वासाला तडा गेला, जेंव्हा कॉंग्रेसचे दोन सदस्य मंगळवारी रात्रीपासून नॉट रिचेबल झाले. शिवेसनेने भाजपच्या एक सदस्याला गायब करण्यात यश मिळवले, तर भाजपने कॉंग्रेसचे दोन सदस्य येणार नाहीत याबाबत खेळी केली. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले तरी सभापती निवडणुकीत राजकीय खेळी मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट झाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज