मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा पोलिसांनी मारापूर येथील जुगार अड्डयावर अचानक छापा मारून एकूण सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मारापूर शिवारातील सरकारी गायरानमधील पडीक जमिनीच्या चिलारीत काही इसम मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी दि.१४ मार्च रोजी सायंकाळी ४.४५ वाजता अचानक तेथे छापा टाकला असता एकूण ७ जण तीन पत्ते मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी समाधान विठ्ठल पाटील, सत्पपाल शिवाजी माने,आण्णासाहेब सुखदेव सकट,पोपट नागू यादव,रंजन क्षत्रीय वाघमारे , अभिमन्यू ज्ञानोबा माने,नितीन रामचंद्र यादव (सर्वजण रा.मारापूर,ता.मंगळवेढा) ताब्यात घेतले असून त्यांचेकडील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे.
याची फिर्याद पो.कॉ.अतुल खराडे यांनी दिल्याने पोलिसांनी आरोपीविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना.अमर सुरवसे हे करीत आहेत.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
Advt
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज