मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यातील माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना घराच्या मालमत्ता करात सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.13) विधानसभेत जाहीर केला. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना मालमत्ता कर सूट योजना जाहीर करण्यात आली आहे.
राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या निर्णयाचा राज्यातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना लाभ होणार आहे. श्री.भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभागाचा देखील पदभार आहे. विभागाच्या पहिल्याच आढावा बैठकीत त्यांनी माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करातून सुट देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करात सूट योजना लागू करण्याचा निर्णय वित्तमंत्री अजित पवार यांनी काल (ता.13) अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना विधानसभेत जाहीर केला होता.
या निर्णयानुसार शहरी व ग्रामीण भागातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महापालिका यांनी स्वच्छेने माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींच्या मालमत्ता कराचा भार स्वत: स्विकारावा व ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांच्यावरील आर्थिक भार ग्रामविकास व नगरविकास विभागामार्फत अदा करण्यात येणार असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.
Advt
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज