मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चला हवा येऊ द्या या मालिकेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर व बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेची नक्कल करून भावना दुखावल्याप्रकरणी या मालिकेतील कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. नीलेश साबळे या तिघांविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे शहर अध्यक्ष शामसुंदर कदम यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहेे. यात म्हटले आहे की, टीव्हीवर झी मराठी वाहिनीवर बर्याच दिवसांपासून ‘चला हवा येऊ द्या’ ही विनोदी मालिका सुरू आहे. या मालिकेत 9 मार्च रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर व बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेची नक्कल करून त्यांच्याजागी या मालिकेतील कलाकारांनी विनोद व नक्कल करून भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या मालिकेतील कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके व डॉ. नीलेश साबळे या तिघांविरूद्धगुन्हा दाखल झाला आहे.
वरील तिघांविरूद्ध कोर्टात खासगी फिर्याद देण्याची समज मिळाली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याचा पुढील तपास फौजदार घुगे करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज