मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । वृद्ध आणि नवजात बालकांमध्ये लागण होण्याचा जास्त धोका असणाऱ्या कोरोना व्हायरसमधून चीनमध्ये अनेक वृद्ध सावरत आहेत.
यामध्ये एका Zhang Guangfen नावाच्या एका आजीबाईंचाही समावेश आहे. ज्यांना १ मार्चला वुहानमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर योग्य उपचारांत्या बळावर सहा ते सात दिवसांत त्यांना घरीही पाठवण्यात आलं होतं. मागील आठवड्यात १०० वर्षांच्या एका व्यक्तीवरही मिलिटरी डॉक्टरांनी उपचार केले, ज्यानंतर तो व्यक्तीही कोरोनातून बचावल्याचं वृत्त समोर आलं.
कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असला तरीही त्याचून बचावलेल्यांचा आकडाही या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये दिलासा देणारा ठरत आहे. मुख्य म्हणजे सुयोग्य उपचार, योग्य काळजी आणि कमालीच्या सकारात्मकतेच्या बळावर कोरोनावर मात करता येऊ शकते असं, भारतातील एका कोरोनाग्रस्त रुग्णाने सर्वांनाच सांगितलं आहे. कोरोनावर मात केल्यानंतर स्वगृही परतलेल्या या रुग्णाने आता इतरांच्या मनात कोरोनाविषयी असणारी भीती दूर करत जनजागृती करण्याचा निर्धारही केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज