मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । दुबईहून भारतात मावदेशी पारतस्नेलो लातूरचे दोन युवक प्रशासनाला सापडत नसल्याची नोभीर बाब समोर आली आहे. लातूरच्या महसूल व आरोग्य विभागाने वरिष्ठ पातळीवरून आलेल्या माहितीआधारे दोन्ही बुवकांचा शोध घेतला.
मात्र ते सापडले नाहीत , आशी माहिती जिल्हाधिकारी जी . श्रीकांत यांनी दिली . लातूर जिल्ह्यातील कोरोना महामारीबाबत जनजागृती व केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देताना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी , दुबईहून आलेले दोन्ही बुवक लातूर शहरातील रहिवासी असल्याचे सांगितले.
दुबईहून भारतात दोघेही पारतले असल्याचे वरिष्ठ पातळीवरून काल २२ मार्च रोजी लातूर प्रशासनाला कळविले आहे . त्या माहितीवरून महमूल , पोलीस व आरोग्य विभागाने दोघांचाही शोध घेतला . मात्र ते सापडलेले नाहीत . कोरोना आजाराच्या भीतीने दोघे लपून बसले असावेत . दोघांची नावे प्रशासनाने गुपित ठेवली असून , प्रशासन यांचा कसून शोध घेत असल्याचे जिल्हाधिकारी जी . श्रीकांत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय दगे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज