मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) आणि भोसरीच्या नवीन रुग्णालयातून कोरोनातून बरे झालेल्या आणखी ५ रुग्णांना रविवारी घरी सोडण्यात आले . त्यातील दोन मुले व महिला या एकाच कुटुंबातील आहेत . एक थायलंडवरून परदेशवारी करून आलेला २५ वर्षीय युवक आहे . त्यामुळे शहरात आता कोरोनाबाधित केवळ ४ रुग्ण आहेत . त्यांची प्रकृती सुधारत आहे . एकाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे.
शहरात एकूण १२ रुग्ण कोरोनाग्रस्त होते . त्यातील वायसीएम रुग्णालयातील ४ पैकी ३ पुरुष रुग्णांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले होते . त्यापैकी परदेशातून आलेल्या एका रुग्णांच्या कुटुंबातील ४ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती . त्यात १२ वर्षांची दोन मुले , ३० व ३३ वर्षांची महिला यांचा समावेश होता . तसेच , परदेशातून आलेल्या एका युवकाचा समावेश होता . या पाच रुग्णांच्या घशातील द्रव्याच्या नमुन्याचे अहवाल शुक्रवारी एनआयव्हीकडून निगेटिव्ह आले . २४ तासांनंतर पुन्हा पाठविलेले नमुन्याचा अहवालही शनिवारी रात्री निगेटिव्ह आले . त्यामुळे त्यांना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घरी सोडण्यात आले . यावेळी डॉक्टर , परिचारिका , वॉर्ड बॉय , सुरक्षारक्षक यांनी त्यांना निरोप दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज