मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अंधकाराला प्रकाशाची ताकद दाखवत आपण एकटं नाही आहोत हे दाखवून द्यायचं आहे.५ एप्रिलला रविवारी रात्री ९ वाजता घरातील सर्व दिवे बंद करा. घरातील दरवाजा किंवा बाल्कनीत उभं राहून ९ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, विजेरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट नऊ मिनिटासाठी सुरु ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
अंधकार दूर करण्यासाठी प्रकाशाचं तेज सर्वत्र पोहोचवायचं आहे. कोरोनाच्या संकटाच्या अंधकाराला आव्हान द्यायचं आहे. प्रशाच्या उर्जेची अनूभुती या कोरोनामय अंधकाराला द्यायची आहे.आपल्याला निरंतर प्रकाराशाच्या दिशेने वाटचाल करायची आहे.
देश एकजुटीने कोरोनाची लढाई लढू शकतो.२२ मार्चला ज्या प्रकारे कोरोनाशी लढणाऱ्यांचे आभार मानले ते आज सर्व देशांसाठी आदर्श प्रस्थापित करणारं कृत्य ठरलं आहे. काही क्षण एकटे बसून देशाचं स्मरण करा. या एकजुटीने कोरोनाला हरवूया आणि भारताला जिंकवूया असा संदेश त्यांनी देशवासियांना दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज