
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शासनाकडून झाडे लावा झाडे वाचवा हे अभियान राबविले जात आहे तर दुसरीकडे बालाजीनगर येथे पर्यावरण संरक्षणासाठी लावलेले झाडे जाळल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी रमेश सिद्धांना पाटील,प्रकाश सिद्धांना पाटील (दोघे रा.कागष्ट ता.मंगळवेढा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि.1 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास फिर्यादीचा पोलीस भरती अकॅडमीच्या बाजूला घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,यातील फिर्यादी श्रीकांत नंदकुमार पवार यांची बालाजीनगर परिसरात पोलीस भरती अकॅडमी असून त्यांनी पर्यावरनाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावली होती.
यातील आरोपीने झाडाच्या बाजूला असणारे तार कंपाउंडच्या बाहेर मुद्दाम हून पालापाचोळा झाडाचे नुकसान होईल हे माहीत असताना पेटवून दिला त्यात फिर्यादीच्या झाडाला झळा लागून एका बाजूने जळली असून त्यात झाडाचे नुकसान झाले आहे.झाडांना तुम्ही जाळ का लावली असे विचारणा करण्यास गेल्यावर फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली आहे.
याअगोदरही ही वारंवार धमकावणे दंडेलशाही करणे साईडची झाडे तोडणे लज्जा वाटेल अशी शिवीगाळ करणे असे कृत्य केलेचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले असून आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 427,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












