मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । हरीयाणा राज्यातील करनाल येथील एका रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने सोमवारी एका कोरोना संशयिताचा मृत्यू झाला . एका ५५ वर्षीय कोरोना संशयिताला कल्पना चावला शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
मात्र , या संशयित रुग्णाने सहाव्या मजल्यावरील कक्षातून पळून जाण्याचा प्रयत्न केला . रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी चादर व प्लास्टिकच्या पिशव्यांची दोरी करून तो सहाव्या मजल्यावरून खाली उतरत असताना कोसळला . यात गंभीर जखमी झाल्याने कोरोना संशयिताचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे विलगीकरण कक्षाच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पानिपत येथील पीडित कोरोना संशयिताला एक एप्रिल रोजी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज