mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वृत्तपत्रांची कोट्यावधींची देणी सरकार कधी देणार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
वृत्तपत्रांची कोट्यावधींची देणी सरकार कधी देणार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । देशभरात गेल्या दोन महिन्यां पासून लॉकडाऊन लागू असल्यामुळे जवळपास सर्वच उद्योगधंदे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक उद्योगांना उतरती कळा लागलेली असताना त्यातून प्रसारमाध्यमे देखील सुटलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर आता प्रसारमाध्यमांच्या काही शिखर संस्थांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. बाजारातून जाहिरातींच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न बंद असताना किमान केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांकडे असलेली शेकडो कोटींची थकबाकी तरी मिळावी, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कोरोनाच्या या संकटामुळे वृत्तपत्र व्यवसायासोबतच टीव्ही न्यूज चॅनल्सना देखील मोठा फटका बसला आहे.

३ हजार कोटींची थकबाकी

देशातल्या माध्यम व्यवसायाच्या या समस्येवर आता भारतीय वृत्तपत्र सोसायटी अर्थात आयएनएस आणि वृत्त प्रक्षेपक संघटना अर्थात एनबीएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वृत्तपत्र उद्योगाच्या आकडेवारीनुसार, अनेक मीडिया कंपन्यांची केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांकडे अनुक्रमे १,५०० कोटी आणि १,८०० कोटी रुपयांची थकीत देणी आहेत. त्यापैकी ८०० ते ९०० कोटी रुपयांची थकीत देणी तर एकट्या वृत्तपत्र उद्योगाची आहेत. एकट्या जाहिरात आणि दृश्य प्रसिद्धी संचालनालयाकडे (डीएव्हीपी) तब्बल ३६३ कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ही देणी थकीत आहेत. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे ई कॉमर्स, अर्थ आणि ऑटोमोबाईल या क्षेत्रांमधून वृत्तपत्रांना मिळणाऱ्या जाहिराती बंद झाल्या आहेत. जाहिरातीतूनच वृत्तपत्रांचा खर्च भागत असतो. त्यामुळे आता शासनाने तरी थकबाकी द्यावी’, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

अनेक वृत्तपत्रांनी छापील आवृत्ती बंद केली

करोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्याच्या अगोदरच सरकारने वृत्तपत्रांच्या जाहिरातींमध्ये मोठी कपात केली. जाहिरातीच नसल्यामुळे अनेक वृत्तपत्रांना आपल्या आवृत्तींची पाने कमी करावी लागली. अनेक सोसायट्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यांच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई केल्याने बहुसंख्य वृत्तपत्रांनी त्यांच्या छापील आवृत्ती काढणेच बंद केले. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारने घरोघरी वृत्तपत्रे टाकण्यास मनाई केली. अनेक मोठ्या शहरांमध्ये वृत्तपत्रे घरोघरी पोहोचू शकत नसल्यामुळे त्याचा फटका त्या वृत्तपत्रांना बसला असल्याचा युक्तीवाद यावेळी आयएनएसने सर्वोच्च न्यायालयात केला. अशाच प्रकारची याचिका एनबीएने सुप्रीम कोर्टात दाखल केली असून वृत्त प्रक्षेपकांसाठी सरकारने लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही सुविधा अथवा पॅकेज जाहीर न केल्याने आमचा उद्योगही ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप त्याद्वारे केला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshMaharashtra Maza

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
चांगली बातमी : सोलापूरच्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने ‘या’ वेळेत आजपासून सुरु करण्यास परवानगी

चांगली बातमी : सोलापूरच्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने 'या' वेळेत आजपासून सुरु करण्यास परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! महाविदयालयात परीक्षेस आलेली १९ वर्षीय मुलगी मंगळवेढ्यातून बेपत्ता; ‘या’ वर्णणाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधा

June 28, 2025
गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग ‘हे’ काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

वाहनधारकांनो! वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही केले, तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार, दरदिवशी होणार ‘एवढा’ रुपये दंड

June 28, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

धर्म आणि जातीच्या भिंती तोडून मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन; एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

June 28, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 28, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा