
समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालय देशातील 141 शहरे कचरामुक्त शहरे म्हणून निवडली असून त्यामध्ये जिल्ह्यातील मंगळवेढा व बार्शी ची निवड झाली असून मंगळवेढा नगरपालिकेने आपल्या कामाचा ठसा 2020 मध्ये देखील कायम ठेवला.
सलग दोन वर्ष नियोजनबध्द केलेले कामकाज, कर्मचा-यांनी घेतलेले परिश्रम,मुख्याधिकारी सर्व नगरसेवकांचे सहकार्य,आणि नागरिकांची साथ यामुळेच नगरपरिषदेस गौरव प्राप्त झाला. शहरांतील स्वच्छतेची कामे व नागरीकांना चांगल्या सुविधा देण्यांस खूप मदत होणार आहे.भविष्यात भूमिगत गटारीच्या कामास प्राधान्य राहिल.असे नगराध्यक्ष अरुणा माळी यानी सांगितले.
नगरपालिकेने यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण व इतर कामात देखील सातत्य कायम ठेवून मंगळवेढ्याचे नावलौकीक कायम ठेवला असून यापूर्वी गतवर्षी नगरपालिकेचा राष्ट्रपती च्या हस्ते नगराध्यक्ष, आरोग्य सभापती, मुख्याधिकारी यांचा गौरव केला होता. यंदा देशातील 141 कचरामुक्त म्हणून निवडण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 76 शहरांचा समावेश आहे. फाईव्ह स्टार शहरात एकाचा तर वन स्टार मध्ये 41 शहराचा समावेश आहे.
सलग दोन वर्ष मंगळवेढा नगरपरिषदेने शहरांतील नागरीक, विविध मंडळ, संस्था यांचे सहकार्याने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांत सातत्य राखल्यामुळे अडीच कोटी रुपये बक्षीस मिळाले. यामधील सव्वा कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेस प्राप्त झालेला असून उर्वरित सव्वा कोटी रुपये स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये सातत्य राखल्यामुळे प्राप्त होणार आहे.
शहरांतील सर्व नागरीक बंधू भगिनी व विविध संस्था, मंडळे, यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये सुध्दा सातत्य ठेवल्याने शहर विकासाची संधी आपल्याला मिळणार असल्याने स्वच्छता व आरोग्य सुविधा या सारखा सतत भेडसावणारा प्रश्न भविष्यात सुटणार आहे असे मत मुख्याधिकारी पल्लवी पाटिल यानी व्यक्त केले.
नगरपालिकेमध्ये सध्या लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये वारंवार तक्रारी होत आहेत परंतु त्यामुळे नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा असताना स्वच्छ सर्वेक्षण सारख्या कामात हे सर्व जण एकजुटीने पालिकेचा गौरव वाढवण्यासाठी प्रयत्न करतात देखील समाधान व्यक्त होत आहे.
—————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













