मंगळवेढा टाईम्स टिम । सोलापूर शहरातील गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे ३० रुग्ण आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी जाहीर केले.या २४ तासात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. यात जेलमधील ११ पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे.
एका वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
नवे रुग्ण या भागातील आहेत :
संगमेश्वर नगर १ महिला,जेल सोलापूर ११ पुरुष ,सहा महिला ,एकता नगर २ पुरुष ,एक महिला,निवासी डॉक्टर वसाहत १ पुरुष, विनायक नगर १ पुरुष,शुक्रवार पेठ १ महिला, लोधी गल्ली एक पुरुष,सिध्देश्वर हौसिंग सोसायटी १ पुरुष आणि एक महिला,हनुमान नगर भवानी पेठ १ महिला,सिध्देश्वर नगर नई जिंदगी १ पुरुष,७० फूट रोड एक महिला. शहरात आतापर्यंत एक हजार १०७ रुग्ण आढळून आले आहेत.
मृतांची संख्या ९ ४ आहे. अद्यापही ४४६ जणांवर उपचार सुरू आहेत. ५६७ जणांना डिस्जार्च देण्यात आला आहे.सोलापूर शहरात आतापर्यंत 1107 पॅाझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 647 पुरुष तर 460 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 94 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 446 पॅाझिटीव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर 567 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत गेलेे आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज