सुरज फुगारे । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना जिल्हा नियोजन मंडळाकडून प्रत्येकी 25 लाख रूपये निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा मंगळवेढयाचे न.पा.पक्षनेते अजित जगताप यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचेकडे एका अर्जाद्वारे केली होती.
अजित जगताप यांच्या मागणीला यश आले असून प्रत्येक नगरपालिकेस जिल्हा नियोजन मंडळांनी निधीला मंजुरी दिली आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमार्फत आवश्यक ती उपाययोजना राबवण्यात येत आहे.याकामी नगरपरिषद अथवा नगरपंचायतीमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, थर्मल स्क्रिनिंग तपासणी करणारे कर्मचारी, घरोघर जावून आय.एल.आय. व सारी चा सर्वे करणार्या कर्मचार्यांना पी.पी.ई.कीट, सेप्टी मास्क, हँड सॅनिटायझर, हॅन्ड वॉश, हॅन्डग्लोज, गम वूट, फेस सिल्ड इ.संरक्षक साहित्याची आवश्यकता भासत आहे. तसेच सर्व नगरपरिषदांमध्ये निर्जंतुकीकरणयासाठी सोडीयम हायपोक्लोराईड या जंतुनाशकाची आवश्यकता होती.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद/नगर पंचायती यांच्या फंडामध्ये पुरेसा निधी उपलब्ध नव्हता. सध्या नगरपरिषदांकडील कर वसुली व पाणीपट्टी वसुली बंद असल्यामुळे उत्पन्न थांबल्याने सोयीसुविधा पुरवण्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्गात वाढ होत असल्याने शहरात परगावहून येणार्या व्यक्तींना होम क्वारंटाईन व इन्स्टिटयुटशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे. सदर व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण करणे कामी त्यांच्या निवासाची सोय करणे, पिण्याचे पाणी, नाष्टा व जेवण याची व्यवस्था करणे, मुलभुत सुविधा देणे या व्यतिरिक्त क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना मास्क, हॅण्डवॉश, हॅन्ड सॅनिटायझर व इतर सुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषदेच्या फंडामध्ये निधी उपलब्ध नसल्याने क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीना सोयी सुविधा देणेबाबत आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या.
अजित जगताप यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन निधीस मंजूरी मिळाली आहे.
Approval of funds from District Planning Board; Success to Ajit Jagtap’s efforts
—————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज