मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
संवाद, समन्वय आणि सामंजस्याच्या बळावर वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारे वादही सुटू शकतात, याचा प्रत्यय मंगळवेढ्यातील महसूल लोकअदालतीत आला.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियानांतर्गत मंगळवेढा तहसील कार्यालयात तडजोडीसाठी नऊ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

त्यापैकी चार प्रकरणांमध्ये वादी आणि प्रतिवादी यांनी परस्पर सामंजस्याने वाद मिटवून रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले.

रस्त्याच्या हक्कावरून शेतकरी आणि संबंधित खातेदारांमध्ये अनेकदा वाद निर्माण होतात. हे वाद न्यायालयीन प्रक्रियेत गेल्यानंतर वेळ आणि पैसा खर्च होण्याबरोबरच अनेक वर्षे प्रलंबित राहतात.

मात्र, महसूल लोकअदालतीच्या माध्यमातून दोन्ही बाजूंना एकत्र आणून संवाद आणि समन्वय साधल्यास अशा प्रश्नांवर सामंजस्याने तोडगा निघू शकतो, हे या अभियानातून स्पष्ट झाले.

सामाजिक सलोख्याचा संदेश
आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सहकार्य करणाऱ्या संबंधित वादी आणि प्रतिवादींचा तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते रोप देऊन सन्मान करण्यात आला.

वाद मिटविण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
“महसूल लोकअदालत अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांचे वाद सामोपचाराने मिटवून त्यांना जलद न्याय मिळवून देणे हा आहे. रस्त्यांसारखे महत्त्वाचे प्रश्न परस्पर सामंजस्याने सुटल्यास शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतात. नागरिकांनी न्यायालयीन वाद वाढविण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे.”-मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










