mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सक्तीने कर्जवसुली कराल तर खबरदार..! मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट कारवाईचा इशारा; शेतकऱ्यांशी २४ तास संवाद : टँकर, चाऱ्यासह सर्वांची व्यवस्था होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 20, 2026
in सोलापूर
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

​सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने दुष्काळ निवारणासाठी थेट युद्धपातळीवर पावले उचलली आहेत.

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत राहणारी विशेष ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात येत आहे.

या माध्यमातून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि इतर समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

​४८ तासांत पोहोचणार पाण्याचा टँकर

​पाणीटंचाई तीव्र असलेल्या गावांमध्ये मागणी नोंदवल्यानंतर अवघ्या ४८ तासांच्या आत पाण्याचा टँकर पोहोचवला जाईल. दुष्काळात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून प्रशासन पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून, वॉर रूमच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर २४ तास बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

​सक्तीने कर्जवसुली केल्यास थेट गुन्हा

​दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकरी व मजुरांना वेठीस धरणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांनी कोणत्याही परिस्थितीत सक्तीने कर्जवसुली करू नये, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

​दसऱ्यानंतर विभागनिहाय हेल्पलाइन नंबर

​शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच विभागनिहाय स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले जाणार आहेत. दसऱ्यानंतर हे सर्व संपर्क क्रमांक जनतेसाठी खुले होतील. या हेल्पलाइनवर येणाऱ्या तक्रारी आणि झालेल्या कामाचा आढावा स्वतः वरिष्ठ अधिकारी दररोज घेणार आहेत.

जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर

आचार संहिता संपल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बँक व मायक्रो फायनान्समार्फत शेतकरी व नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देणार.

४८ तासांच्या आत टँकर परवानगी आणि ६०० टैंकर चालवण्यासाठी फिडिंग पॉईंटची दुरुस्ती. सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठी प्रयत्न करणार.

डीपीडीसीमधून दुष्काळाची कामे हाती घेऊन १ नोव्हेंबरपासून ‘व्हिबीजीरामजी ‘ची कामे सुरू करणार. महापालिका व नगरपालिकांचा आढावा घेऊन १० टक्के पाणीकपात करण्याचे आदेश आणि जलजीवनची कामे प्राधान्याने मार्गी लावणार.

उजनीतील प्रकल्पांचा फायदाच होणार

उजनी धरण परिसरात प्रस्तावित सोलर आणि डेटा सेंटर या दोन मोठ्या प्रकल्पांमुळे पाणी कमी होणार नसून उलट २ टीएमसी पाणी वाचणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. डेटा सेंटरसाठी केवळ अर्धा टीएमसी पाणी लागेल, तर सोलर प्रकल्पामुळे अडीच टीएमसी पाणी वाचेल. सर्वाच्या संमतीनेच हे प्रकल्प पुढे नेले जातील, असे सांगत त्यांनी स्थानिकांना आश्वस्त केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 19, 2026
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 19, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026

ताज्या बातम्या

धनश्री मल्टिस्टेट बँकेचे अकराव्या वर्षात दमदार पदार्पण; सर्वोत्कृष्ट सेवेतून यशस्वी वाटचाल!

मंगळवेढ्यातील ‘धनश्री मल्टीस्टेट’चा आज १५ वा वर्धापन दिन सोहळा; १५२५ कोटी ठेवींचा ऐतिहासिक टप्पा गाठणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था

October 20, 2026
मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

October 19, 2026
शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

October 19, 2026

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 19, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अत्यंत हृदयद्रावक! शेतकरी बापाची उच्चशिक्षित लेक हरपली; उपचारादरम्यान काशिशची प्राणज्योत मालवली; मंगळवेढ्यात काळाचा क्रूर घाव

October 19, 2026
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा