टीम मंगळवेढा टाईम्स :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे आंदोलनासाठी जाणाऱ्या मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील समाजबांधवांसाठी मंगळवेढ्याचे ॲड. सम्राट सतीश हजारे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

या आंदोलनादरम्यान आंदोलक बांधवांवर कोणतीही कायदेशीर किंवा पोलीस कारवाई झाल्यास, त्यांना पूर्णपणे विनामूल्य (मोफत) कायदेशीर सहकार्य व न्यायालयीन मदत देणार असल्याचे ॲड. सम्राट हजारे यांनी जाहीर केले आहे.

मराठा आरक्षणाच्या हक्काच्या लढ्यासाठी मंगळवेढा तालुका आणि शहरातून मोठ्या संख्येने समाजबांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.

शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांवर कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे किंवा कायदेशीर अडचणी उद्भवल्यास समाजबांधवांनी घाबरून जाऊ नये, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत ॲड. हजारे यांनी व्यक्त केले.

”एक मराठा, लाख मराठा” या भावनेतून समाजाची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगत, गरज पडल्यास मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागातील बांधवांनी ९५११८८४४५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ॲड. सम्राट सतीश हजारे यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











