टीम मंगळवेढा टाईम्स | अकलूज
बचत गट व भिशीच्या माध्यमातून रक्कम जमा करून पाच वर्षांत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत अनेक सभासदांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तोंडले (ता. माळशिरस) येथील तिघांना वेळापूर पोलिसांनी

ब्रम्हदेव केशव मोरे, अनिल अशोक गुजर व अनिकेत ब्रम्हदेव मोरे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी १८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता.

तोंडले (ता. माळशिरस) येथील माधव शाहू चव्हाण यांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद वेळापूर पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जानेवारी २०२० ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित तिघांनी गावात ‘स्वामी समर्थ’ नावाने बचत गट सुरू करून सभासदांकडून दरमहा बचत रक्कम जमा करण्यास सुरुवात केली.

जमा केलेली रक्कम पाच वर्षांत दामदुप्पट करून देण्याबरोबरच गरजू सभासदांना कमी व्याजदराने कर्ज देण्याचे तसेच बचत गटाचे रजिस्ट्रेशन करून शासकीय योजनांचे अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप केला आहे. फिर्यादी माधव चव्हाण यांच्या बचत गट व भिशीमध्ये मिळून ५ लाख १२ हजार ४३० रुपये रक्कम जमा झाली आहे.

तसेच अनेक सभासदांची रक्कम परत न करता एकूण २ कोटी १० लाख ९३ हजार ५४० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या प्रकरणातील संबंधित व्यक्तींकडून आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली जात असून, जमा रक्कम आणि परत करण्यात आलेल्या पैशांचीही चौकशी केली जात आहे. फसवणुकीचा नेमका आकडा आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

भिशीतील रक्कम परत करण्यास टाळाटाळ
यानंतर ‘अष्टविनायक भिशी’ सुरू करून त्यामध्येही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करण्यात आली. भिशीतील रक्कम तीन वर्षांत दुप्पट करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे फिर्यादीने नमूद आहे.
सुरुवातीच्या काळात काही सभासदांना रक्कम व परताव्याच्या पावत्या देण्यात आल्याने नागरिकांचा संबंधितांवर विश्वास बसला. मात्र कालांतराने बचत गट व भिशीतील रक्कम परत करण्यास टाळाटाळ सुरू झाल्याच फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















