टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या १५ वर्षांपासून कोकणात ज्ञानदानाचे कार्य करणारे मंगळवेढ्याचे सुपुत्र आणि वेतोरे हायस्कूलचे अत्यंत लोकप्रिय शिक्षक पांडुरंग बिराप्पा वगरे (वय ५० रा.धर्मगाव) यांनी वेतोरे पालकरवाडी (तालुका वेंगुर्ला) येथे राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

या दुर्दैवी घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यासह वेंगुर्ला परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात असून शोकाकुल वातावरण पसरले आहे.

विद्यार्थी अन् पालकांचे आवडते शिक्षक!
मूळचे मंगळवेढा येथील रहिवासी असलेले पांडुरंग वगरे गुरुजी गेल्या १५ वर्षांपासून वेतोरे हायस्कूलमध्ये कार्यरत होते. आपल्या अत्यंत प्रेमळ आणि हसतमुख स्वभावामुळे त्यांनी विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि स्थानिक पालकांमध्ये एक वेगळे आदराचे स्थान निर्माण केले होते.

विद्यार्थ्यांसोबत असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आणि अभ्यासातील मार्गदर्शन यामुळे ते सर्वांचे अत्यंत आवडते शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

अशी उघडकीस आली घटना:
मिळालेल्या माहितीनुसार, पालकरवाडी (वेतोरा) येथील शुभम जयवंत गोगटे यांच्या शेजारीच वगरे गुरुजी राहत होते. मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे लक्षात येताच शुभम गोगटे यांनी तातडीने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून वेंगुर्ले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला व पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील अधिक तपास पोलीस हवालदार सरफादार करत आहेत. वगरे गुरुजींनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










