मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
जगातील पहिली लोकशाही संसद मंगळवेढ्यात स्थापन करणारे वीरशैव लिंगायत धर्मप्रसारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
स्मारकासाठी वास्तुविशारद सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे.

पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सन २०२६-२७ मधील ई-निविदा सूचना क्रमांक ८ प्रसिद्ध केली आहे. पात्र तांत्रिक सल्लागार व संस्थांकडून ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या आहेत.

या कामाची अंदाजित किंमत २४ लाख ८२ हजार निवेदेसाठी २५ हजार इसारा रक्कम ऑनलाइन भरावी लागणार आहे. निवड झालेल्या सल्लागारास पावसाळ्यासह तीन महिन्यांत काम पूर्ण करावे लागणार आहे.

राज्य शासनाने मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी वीरशैव लिंगायत समाजाची व्यापक चळवळ उभारून पुढील दोन वर्षात स्मारक साकार करण्याच्या उद्देशाने महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समिती स्थापन करण्यात आली होती.

या स्मारकासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

७ जुलैला निविदा उघडणार
निविदा डाउनलोड व सादर करण्याची प्रक्रिया २९ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाली असून, ६ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

तांत्रिक व आर्थिक निविदा ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सोलापूर यांच्या कार्यालयात ऑनलाइन उघडण्यात येणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









