mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 2, 2026
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

टीम ​मंगळवेढा टाईम्स |

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी मंगळवेढा पंचायत समिती आणि ‘प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पत्राद्वारे समोर आली आहे.

या अंतर्गत ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिकल, सोलर आणि हेल्थ केअर क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांना मोफत व सवलतीच्या दरात निवासी प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती मंगलवेढाचे गट विकास अधिकारी योगेश कांबळे यांनी तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आपापल्या गावात या योजनेची जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.

​ कोणत्या क्षेत्रात मिळणार प्रशिक्षण?

​दिलेल्या तपशिलानुसार खालील कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे:

​फोर व्हीलर टेक्निशियन (ऑटोमोटिव्ह क्षेत्र): लोहगाव (पुणे) व सातारा येथे निवासी प्रशिक्षण.
​इलेक्ट्रिकल आणि सोलर क्षेत्र: भोर येथे निवासी प्रशिक्षण.

​जनरल ड्युटी असिस्टंट (हेल्थ केअर): बारामती येथे अनिवासी (Non-residential) कोर्स.काय आहेत मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे?

​राहण्याची व जेवणाची उत्तम सोय: पात्र विद्यार्थ्यांसाठी निवासी केंद्रांमध्ये राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था पूर्णपणे मोफत किंवा अत्यंत सवलतीच्या दरात केली जाईल.

​१००% नोकरीसाठी साहाय्य: कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरी मिळवून देण्यासाठी संस्था पूर्ण सहकार्य करणार आहे.

​SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत व विद्यावेतन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी), पुणे यांच्याशी झालेल्या सामंजस्य करारानुसार, अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण केल्यास प्रतिमहा ₹४,०००/- विद्यावेतन (Stipend) बार्टीमार्फत दिले जाईल. तसेच त्यांच्यासाठी कोर्स फी फक्त ₹१,२००/- असेल (इतर विद्यार्थ्यांसाठी बारामती येथील कोर्ससाठी ₹२,०००/- फी आहे).

​त्वरित नोंदणी करा! येथे साधा संपर्क:

​आपल्या गावातील बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपली नोंदणी निश्चित करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे: ​मार्गदर्शक: अतुल मोरे ​मोबाईल नंबर:  9960546672 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पंचायत समिती सभापती सभापती दीपाली आनंद ताड यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पंचायत समिती सभापती दीपाली ताड

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सिंघम रिटर्न! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; बाजारपेठेतून सुटे तेल गायब, बनावट दूध, पनीर विक्रेते रडारवर; डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; भेसळखोरांचे धाबे दणाणले

July 2, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऐतिहासिक मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?

July 2, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

शेतजमीन नसली, तरीही राबणारी महिला ‘शेतकरी’च; महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर; कोणाला मिळेल दर्जा? कुठे करावा अर्ज?

July 2, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

July 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​सणाच्या नावाखाली अश्लीलता! मंगळवेढ्यात विनापरवाना महिलांचे डान्स प्रोग्राम आयोजित करणाऱ्या ७ जणांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

July 1, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

मंगळवेढ्यात खळबळ! शेतरस्ता खुला करताना मंडल अधिकाऱ्याची धरली गच्ची; ६ जणांवर गुन्हा

July 1, 2026
कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

July 1, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

महिला सक्षमीकरणासाठी ‘वीरश्री’ पतसंस्थेचे मोठे पाऊल; महिला उद्योजकांना केवळ ‘इतके’ टक्के व्याजदराने कर्ज, विविध ठेव योजनांचाही शुभारंभ

July 1, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोठी संधी! मंगळवेढ्यात मध्य भागी असलेले मंगळवेढा- पंढरपूर बायपास रोड टच रहिवाशी क्षेत्र मधील ओपन प्लॉट्सचा सर्वसुविधांसह सुविधा-समृद्ध प्रकल्प; अमर डेवलोपर्स: 9132105105 वर कॉल करून आजच भेट द्या

June 30, 2026

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सिंघम रिटर्न! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; बाजारपेठेतून सुटे तेल गायब, बनावट दूध, पनीर विक्रेते रडारवर; डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; भेसळखोरांचे धाबे दणाणले

July 2, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऐतिहासिक मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?

July 2, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

शेतजमीन नसली, तरीही राबणारी महिला ‘शेतकरी’च; महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर; कोणाला मिळेल दर्जा? कुठे करावा अर्ज?

July 2, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

July 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​सणाच्या नावाखाली अश्लीलता! मंगळवेढ्यात विनापरवाना महिलांचे डान्स प्रोग्राम आयोजित करणाऱ्या ७ जणांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

July 1, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

मंगळवेढ्यात खळबळ! शेतरस्ता खुला करताना मंडल अधिकाऱ्याची धरली गच्ची; ६ जणांवर गुन्हा

July 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..