मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
जून महिना सुरू होताच मंगळवेढ्यात खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे ७ जूनच्या मृग नक्षत्रापासून पावसाला प्रारंभ होत असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुका कृषी कार्यालयाकडून खरीप हंगामासाठी विविध बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत तूर, सूर्यफूल, मूग, बाजरी आणि मका या प्रमुख पिकांच्या बियाण्यांचे वाटप केले जाईल.

इच्छुक शेतकऱ्यांनी आपले मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने ‘महा डी.बी.टी.’ (MahaDBT) पोर्टलवर सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.

लॉटरी पद्धतीने होणार वाटप
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर या बियाण्यांचे वाटप लॉटरी (सोडत) पद्धतीने करण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












