टीम मंगळवेढा टाईम्स । अक्कलकोट शहरात नव्याने आढळलेल्या तीन कोरोनाबधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या २३ जणांचे स्वब शनिवारी घेण्यात आले आहेत अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.यामध्ये गुरुवारी प्रलंबित चार अहवालाचा समावेश आहे.
अक्कलकोट शहरात मौलाली गल्ली येथे एकूण चार कोरोनाबधित रुग्ण आढळले असून त्यातील दोन मयत झाले असून दोघांवर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे बागवान गल्लीत एक तर समर्थ नगर बँगेहळ्ळी रोड येथे एक याप्रमाणे एकूण चार रुग्णावर उपचार सुरू आहेत. एकूण तीन कोरोनाबधितरुग्णांच्यासंपर्कातील तेवीस जणांचे स्वब शनिवारी घेतले गेले आहेत.
गुरुवारी याचप्रकरणी सतरा स्वब घेण्यात आले होते त्यातील तेरा निगेटिव्ह आले होते तर चार अहवाल तांत्रिक अडचणीने प्रलंबित ठेवले होते.आज त्यातील चार जणांच्या पुन्हा घेतलेल्या स्वबचाही समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज