मंगळवेढा टाईम्स न्युज।
राज्यातील नुकत्याच निवडणूक झालेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमधील अध्यक्षपद आणि सभापतिपदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा संपली असून २० मार्चपूर्वी ही निवडणूक घ्यावी लागणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यानंतर अध्यक्षपद आणि सभापतिपदाची निवडणूक कधी होणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. ग्रामविकास विभागाने गुरुवारी जारी केलेल्या आदेशाने ही प्रतीक्षा संपली आहे.

अध्यक्ष, सभापती निवडणुकीसंदर्भात हा आदेश आल्याने ज्या जिल्ह्यांत आघाडी किंवा महायुतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी संघर्ष आहे तिथे जुळवाजुळवीला वेग येणार आहे. सत्ता आणण्यासाठी तिथे आता बैठकांना वेग येईल.

ग्रामविकास विभागाने जारी केले आदेश
ग्रामविकास विभागाने गुरुवारी १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची पहिली बैठक २० मार्चपूर्वी आयोजित करण्याचे आदेश या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

यात निवडणूक झालेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











