mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 15, 2026
in राष्ट्रीय
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

20 विश्वचषक 2026 मध्ये चाहत्यांना ज्या हाय-व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा होती, त्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कोलंबोच्या ऐतिहासिक आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या विजयासह 6 गुणांची कमाई करत सुपर-8 फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

या पराभवामुळे पाकिस्तानच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना आपला शेवटचा सामना ‘करो किंवा मरो’ अशा स्थितीत कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.

ईशान किशनने वाजवलं पाकिस्ताचं बँड

भारताने 20 षटकांत सात गडी बाद 175 धावा केल्या. भारताकडून ईशान किशनने अर्धशतक झळकावले.

विशेष म्हणजे, या सामन्यात पाकिस्तानने फिरकी गोलंदाजांनी भारताविरुद्ध 18 षटके टाकली. भारताकडून ईशानने 40 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 77 धावा केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत तीन चौकारांसह 32 धावा केल्या.

भारताकडून शिवम दुबे 27 धावा करून बाद झाला, तर तिलक वर्माने 25 धावा केल्या. रिंकू सिंग चार चेंडूत एक चौकार आणि एक षटकारासह 11 धावा करून नाबाद राहिला.

पाकिस्तानकडून सॅम आयुबने तीन बळी घेतले, तर सलमान आघा, शाहीन आफ्रिदी आणि उस्मान तारिकने प्रत्येकी एक बळी घेतला.

टीम इंडियाने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले

176 धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या आणि बुमराह जोडीने पाकिस्तानच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.

अवघ्या 12 चेंडूच्या खेळात पाकिस्तानचा कर्णधार आणि टॉप ऑर्डर तंबूत परतले. हार्दिक पांड्याने डावाच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानला पहिला आणि मोठा धक्का दिला. सलामीवीर साहिबजादा फरहान याला खातेही उघडता आले नाही.

बुमराहने डावाच्या दुसऱ्या षटकात सॅम अयुबला (6 धावा) पायचीत (LBW) करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. बुमराह इथेच थांबला नाही.

त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला (4 धावा) आऊट केले. फक्त 13 धावांवर 3 महत्त्वाचे गडी गमावल्यामुळे पाकिस्तानचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे पाकिस्तानचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्यामुळे पाकिस्तानचा पूर्ण संघ अवघ्या 114 धावांवर गारद झाला. यामुळे भारताला हा एकतर्फी विजय मिळवता आला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत पाकिस्तान

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
Next Post
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या 'ड्रेझर' खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

ताज्या बातम्या

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा