मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा येथील दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा जनआंदोलन करणार असल्याचा इशारा दामाजीनगर ग्रामपंचायत सदस्य अर्जुन ओमने यांनी दिला आहे.
मंगळवेढा गटविकास अधिकारी जासमीन शेख यांच्याकडे यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे को, मंगळवेढा दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्गुरु बैठक रोड (भिवाची वाट) येथील कॉकीटीकरण करणेकरीता

आमदार समाधान आवताडे यांचे प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळातून नागरी सुविधा अंतर्गत सुमारे १० लाख रुपये दि. २५/०८/२०२५ रोजी मंजूर झाले असून

ग्रामपंचायत प्रशासन राजकीय दबावातुन जाणुन बुजुन सदर कामाकरीता ठराव दिलेला नाही.

त्यामुळे सदरचे काम अद्यापपर्यंत सुरु झालेले नाही, तरी आपण तात्काळ ग्रामविकास अधिकारी यांना कायद्यातील तरतुदीनुसार आपले अधिकारात काम मंजूर करुन काम सुरु करण्याचा आदेश द्यावा अन्यथा आपल्या कार्याल समोर जन अंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी अर्जुन ओमने, पिंकू जगताप, नितीन घंटे, ग्रामपंचायत सदस्य शोभा भारत जगताप, नितीन गोवे, बंडू ओमने, विश्वास चव्हाण, अँड.संभाजी घुले, राहुल कोळेकर, आर्यन कारंडे यांनी सह्या करून निवेदन दिले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













