मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील आमदार जनसंपर्क कार्यालय दालनात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासमवेत सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

या मुलाखतींच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची कामगिरी, जनसंपर्क, आणि पक्षनिष्ठेचा आढावा घेण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे बळ अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे विजय सुनिश्चित करण्यासाठी ही मुलाखत प्रक्रिया पार पडली.

याप्रसंगी नगरपरिषद निवडणूक प्रभारी राजेंद्र सुरवसे, माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मोगले, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे तसेच इतर पदाधिकारी व इच्छुक उपस्थित होते.

भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी यांनी दिली मुलाखत
पाच इच्छुक पैकी तेजस्विनी सुजित कदम, राधा राजेंद्र सुरवसे, सुप्रिया अजित जगताप यांनी नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या आहेत यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

नगरसेवक पदासाठी 10 प्रभागातील 82 इच्छुकांनी मुलाखत दिल्या.
मंगळवेढा नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी 10 प्रभागातून तब्बल 82 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यांपैकी फक्त 20 जणांनाच भाजप कमळ चिन्हावर उभे करणार आहे.
गैरहजर त्यांचा विचार केला जाणार नाही
मुलाखतीसाठी जे इच्छुक उमेदवार हजर होते त्यापैकीच काहींना उमेदवारी देणार आहे जे इच्छुक गैरहजर होते त्यांचा विचार केला जाणार नाही, भाजप निवडणूक कमळ या चिन्हावर लढणार आहे.- राजेंद्र सुरवसे, प्रभारी मंगळवेढा नगरपालिका निवडणूक भाजप.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










