मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
भारतीय निवडणूक आयोगाकडून आज सोमवारी मतदारयाद्यांबाबतचा आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण देशात मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीच्या तारखांची घोषणा सोमवारी केली जाणार आहे.

आयोगाकडून आज दुपारी 4.15 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार असून त्यामध्येच याबाबत अधिकृतपणे माहिती दिली जाईल.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह सिंधू आणि विवेक जोशी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील. बिहार विधानसभा निवडणुकीआधी आयोगाने मागील अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच

या राज्यात मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीचा निर्णय घेण्यात आला. त्यावरून बरंच राजकारणही तापलं. हा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. पण त्यानंतरही आता आयोगाने संपूर्ण राज्यासाठी प्लॅन तयार केला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, आयोगाकडून पहिल्या टप्प्यात देशातील 10 ते 15 राज्यांमध्ये SIR ची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यामध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणूक होणार असलेल्या पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांचा प्रामुख्याने समावेश असेल. या प्रक्रियेमध्ये मतदारयाद्या अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे ही प्रक्रिया महत्वाची असेल.

नव्या मतदारांची नोंदणी, मृत मतदारांचे नाव हटविणे, दुबार नोंदणी रद्द करणे, यादीतील इतर चुका दुरूस्त करण्याचे महत्वपूर्ण या प्रक्रियेत केले जाणार आहे. बिहारमध्ये प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोगाने मतदारयादी शुध्द झाल्याचे म्हटले होते. तशीच प्रक्रिया उर्वरित राज्यांमध्ये राबविण्याचा नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे.

पहिल्या टप्प्यात पाच राज्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाऊ शकते. त्यापैकी आसाम आणि पुद्दुचरी वगळता उर्वरीत चार राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील पक्षांची सत्ता आहे. बिहारमध्ये आघाडीतील पक्षांनी एसआयआरवरून आयोगावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या राज्यांतील एसआयआरवर संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.

महाराष्ट्रात कधी होणार?
महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात एसआयआर होण्याची शक्यता नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ता. ३० जानेपारीपर्यंत आयोगाला या निवडणुका पार पाडायच्या आहेत. त्यामुळे एसआयआरसाठी आयोगाकडे वेळ नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह स्थानिकच्या निवडणुका काही दिवसांवर नियोजित असलेल्या राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात एसआयआर होईल.

मतचोरी घोळ
महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांनी कथित मतचोरीवरून रान उठवले आहे. येत्या १ नोव्हेंबरला विरोधकांकडून मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
तर मतदारयाद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, याबाबतही उत्सुकता असेल.(स्रोत:सरकारनामा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













