मंगळवेढा टाईम्स न्युज। संपादक समाधान फुगारे
दिव्यांगांसह गरीब व अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करताना त्यांचे शैक्षणिक करिअर घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील मुक्ताई अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह या सामाजिक संस्थांतील 52 मुला-मुलींनी मातीच्या 5 हजार पणत्या आकर्षकपणे बनवल्या आहेत.
लवंगी येथील मुक्ताई अनाथ मतिमंद बालगृह यांच्या वतीने मुला-मुलींना ही संधी देण्यात आली होती.
या कामातून या मुला-मुलींना काही उत्पन्न मिळणार आहे व यापैकी काही पैशांतून अगरबत्ती बनवण्याचे मशीन व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
संस्थांद्वारे शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना दिवाळीनिमित्त काही आर्थिक उत्पन्न मिळावे तसेच त्यांच्यातील कलागुणांना चालना देण्यासाठी दिवाळीच्या आधी मातीच्या पणत्या बनवण्याचा सामूदायिक उपक्रम केला होता.
दिवाळीसाठी आकर्षक पणत्या तयार करण्याचे प्रशिक्षण मुलांना तज्ज्ञांद्वारे देण्यात आले होते. त्यानंतर 52 या मुलांनी 5 हजार पणत्या तयार करण्यात आले.
विविध रंगांचा वापर करून व आकर्षक पद्धतीने रंगवून तसेच सजावट करून पणत्यांची पाकिटे तयार करण्यात आली आहेत.
पणत्या खरेदी करण्यासाठी संपर्क साधावा
मुक्ताई अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहातील (लवंगी )अनाथ निराधार दिव्यांग मुलांनी त्यांच्या अंगी असलेले सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेने दिवाळी सणानिमित्त पणती बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तरी मुलांनी एकदम सुंदर सुबक पणत्या बनवल्या आहेत तरी संस्थेकडून विनंती की आपण पणत्या घेऊन सहकार्य करावे.
अजिंक्य जाधव : 9307286287
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज