mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोदी सरकारची सणासुदीच्या काळात मोठी भेट, जीएसटीत बदल केल्याने ‘या’ वस्तू होणार स्वस्त; आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच कर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 4, 2025
in राष्ट्रीय
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

देशातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून जीएसटी स्लॅबमध्ये मोठा बदल केला आहे. देशातील 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतला आहे.

त्यामुळे आता केवळ 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच जीएसटीचे स्लॅब असणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह घरंही स्वस्त होणार आहेत. येत्या 22 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी स्लॅबमध्ये बदल झाल्याची माहिती दिली. या निर्णयामुळे देशातील शेतकरी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार असल्याचं त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हा निर्णय शक्य झाल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

जीएसटीचे दोनच स्लॅब

दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे बुधवारी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या मॅरेथॉन बैठकीत कर प्रणालीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल 10 तासांपेक्षा जास्त चाललेल्या या बैठकीत 12 टक्के आणि 28 टक्केचे स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आता 5 टक्के आणि 18 टक्के असे फक्त दोनच स्लॅब राहणार आहेत. केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जीएसटी बैठकीतील प्रमुख निर्णय

कर सुलभ रचना

– 12% आणि 28% स्लॅब रद्द.

– 12% मधील 99% वस्तू आता 5% मध्ये.

– 28% मधील बहुतांश वस्तू 18% मध्ये.

– पान मसाला, तंबाखू यांसारख्या सिन गुड्स (Sin Goods) आणि लक्झरी गाड्यांवर 40% चा नवीन स्लॅब प्रस्तावित.

रिफंड प्रक्रिया (GST Refund):

– ऑटोमॅटिक रिफंड सिस्टीम लागू होणार.

निर्यातकांसाठी सवलत (Exporters Relief):

– रजिस्ट्रेशन कालावधी 1 महिना वरून फक्त 3 दिवसांवर आणला. त्याचा फायदा निर्यातकांना होणार आहे.

कपडे व पादत्राणे (Clothes & Footwear):

– 2,500 रुपयांपर्यंतच्या वस्तूंवर जीएसटी आता फक्त 5 टक्के कर लावण्यात येणार असल्याने कपडे आणि पादत्राणे अशा वस्तू स्वस्त होणार आहेत.

दैनंदिन वस्तूंवर सवलत

– पनीर, खाखरा, चपाती, साबण, टूथपेस्ट, शॅम्पू यांसारख्या वस्तूंवरील कर 18% वरून 5% किंवा 0% करण्याबाबत चर्चा.

आरोग्य विमा व जीवन विमा (Health & Life Insurance):

– 5 लाख रुपयांपर्यंतच्या हेल्थ पॉलिसी व टर्म इन्शुरन्सवर पूर्ण सूट मिळण्याची शक्यता.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयांची घोषणा केली. तज्ज्ञांच्या मते, जीएसटीमधील या मोठ्या बदलांमुळे कररचना अधिक सोपी होईल आणि सामान्य नागरिकांवरचा आर्थिक भार कमी होईल.

एसी, वॉशिंग मशीन, 38 इंचापेक्षा मोठे टीव्ही, लहान कार इत्यादींवर आता 18 टक्के जीएसटी आकारला जाईल, तर पूर्वी त्यावर 28 टक्के जीएसटी आकारला जात होता. पान मसाला, सिगारेट, गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ, विडी यांना विशेष श्रेणीत ठेवण्यात आले असून 40 टक्के जीएसटी असणार आहे..

फ्लेवर्ड कार्बोनेटेड पेये देखील या स्लॅबमध्ये ठेवण्यात आली आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याबाबतचा सूतोवाच केला होता. पंतप्रधान ज्या सुधारणांबद्दल बोलले होते त्या दिशेने आम्ही काम केले आहे. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी दर सुसूत्रीकरणात सहकार्य केले आणि आम्ही हा निर्णय एकमताने घेतला आहे.

काय स्वस्त होणार

आरोग्य उपकरणे आणि 33 औषधांवर जीएसटी आकारला जाणार नाही. चष्मा आणि दृष्टीशी संबंधित उपकरणांवरही 5 टक्के जीएसटी असेल.सुक्या मेव्यांवरील म्हणजेच काजू, बदाम, पिस्ता, खजूर, मिश्र काजू, नारळ पाणी, सोया मिल्क ड्रिंक, फळांच्या रसावर आधारित पेय, दुधावर आधारित पेय यासारख्या पॅकेज्ड पेय, पास्ता, नूडल्स, कॉर्नफ्लेक्स, फ्रूटेड राईस, बिस्किटे, केक, पेस्ट्री, नमकीन, भुजिया, इत्यादींवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

संगमरवरी, चामडे, शेतकरी आणि त्यांच्या उत्पादनांवर आकारण्यात येणारा 12 टक्के जीएसटी देखील 5 टक्के करण्यात आला आहे. आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसींवरील जीएसटीमध्येही मोठी सवलत देण्यात आली आहे. शूज आणि कपड्यांवरही मोठी सवलत देण्यात आली आहे. आता त्यावर 12 टक्क्यांऐवजी फक्त 5 टक्के जीएसटी आकारला जाईल.

काय महाग होणार

लक्झरी वस्तू, कार आणि बाईक अधिक महाग होतील. कारण नव्या स्लॅबमध्ये यांना विशेष स्लॅब देण्यात आला आहे. तंबाखू, जर्दा, पान मसाला, फ्लेवर, फ्रूट ड्रिंक आणि इतर पॅकेज्ड पेये महाग होतील. 350 सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक महाग होतील.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फिर एक बार मोदी सरकार

संबंधित बातम्या

दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
Next Post
लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मंगळवेढ्यात रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे; लोकराजा राजर्षी शाहू महाराज फाउंडेशनने जाहीर निषेध करत खड्ड्यामध्ये लावली झाडे

लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मंगळवेढ्यात रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे; लोकराजा राजर्षी शाहू महाराज फाउंडेशनने जाहीर निषेध करत खड्ड्यामध्ये लावली झाडे

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा